न्यू सरस्वती फाउंडेशनतर्फे पूर्ण झालेले, सध्या सुरु असलेले व आगामी प्रस्तावित प्रकल्प.
ग्रामीण भागातील शासकीय प्राथमिक शाळेमध्ये १० मोफत संगणकांसहित डिजिटल लॅब उभारणी पूर्ण.
१०० गरजू महिलांना मोफत शिवण यंत्र देऊन कापडी पिशव्या व गणवेश शिवण्याचा शाश्वत रोजगार उपलब्ध करणे.
५० शेतकऱ्यांच्या शेतावर आदर्श गांडूळ खत खाटांची मोफत उभारणी व थेट बाजारपेठ जोडणी.
दुर्गम वाड्या-वस्त्यांवर आठवड्यातून दोनदा मोफत डॉक्टरी तपासणी व औषध वाटप करणारी रुग्णवाहिका.
पावसाचे पाणी साठवण्यासाठी व विहिरींची भूजल पातळी वाढवण्यासाठी स्थानिक सहभागातून वनराई बंधारा निर्मिती.
मिर्खेंडा येथे मृद व जलसंधारण विभागाच्या सहयोगाने गाळमुक्त धरण व शाळयुक्त शिवार प्रकल्पाचे यशस्वी अंमलबजावणी.